Mumbai News - तोट्यातील एसटी लवकरच फायद्यात येणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2023

Mumbai News - तोट्यातील एसटी लवकरच फायद्यात येणार


मुंबई - मागील वर्षभरापासून तब्बल 4000 कोटी रुपये तोट्यात असलेली एसटी आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचा हा तोटा अगदी दहा कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात एसटी महामंडळ फायद्यात येण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाचा चार हजार कोटी रुपये एकीकडे तोटा असताना दुसरीकडे गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. अजित पवार अर्थमंत्री असताना महिना 300 कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती. मात्र ती देखील रक्कम वेळेत न मिळाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता.

दिवसेंदिवस वाढत जाणारा तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाला खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या मदतीची गरज होती. दरम्यानच्या काळात एसटीने प्रवास करण्यापेक्षा खाजगी वाहनांना प्रवास करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत होता. मात्र त्यावेळी नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आणि याचा फायदा एसटी महामंडळाला झाल्याचे पाहायला मिळालं.

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के आणि 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना 100 टक्के प्रवासात तिकीटात सवलत दिली. तर महिलांना थेट 50 टक्के एसटी भाड्यात सवलत दिली, त्याचा फायदा होताना दिसत असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad