मुंबई - मुंबईत २३ जून पासून पावसाला सुरुवात झाली आहे. काल बुधवारी मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. त्याचसोबत झाडेही कोसळली. काल आणि आज दोन दिवसात मालाड, गोरेगाव आणि भायखळा येथे झाडं कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (Three dead after falling tree in Mumbai) दोन दिवसात तीन जणांचा झाडं पडून मृत्यु झाल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
झाड पडून तीन जणांचा मृत्यू -
मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ आहे. येथे सुमारे 35 फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड २८ जून रोजी सकाळी कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळं बुधवारी पहाटे कौशल दोषी वय 33 यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच दिवशी दुपारी गोरेगाव पश्चिम येथे जुन्या पालिका कॉलनी जवळ झाड एका घरावर कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला. प्रेमलाल निर्मल असे मृताचे नाव असून तो ३० वर्षाचा आहे. आज २९ जून रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास भायखळा पोलीस स्टेशन येथील इंदू ऑईल मिल कापाऊंडमधील एक झाड कोसळले. या झाडाखाली २ ते ३ लोक अडकले असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाने दोन जणांना बाहेर काढून जे जे रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. रहेमान खान वय २२ याचा मृत्यू झाला तर रिझवान खान वय २० वर्षे याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment