चंद्रशेखर आजाद यांच्यावर हल्ला, भीम आर्मीची २९ जूनला दादरमध्ये निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2023

चंद्रशेखर आजाद यांच्यावर हल्ला, भीम आर्मीची २९ जूनला दादरमध्ये निदर्शने


मुंबई - भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करून हल्ला केल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीच्या वतीने उद्या गुरूवार दिनांक २९ जून रोजी दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथे निदर्शने केली जाणार आहेत. दरम्यान या हल्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निषेध केला असून चौकशीची मागणी केली आहे. 

भीम आर्मी संस्थापक  आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये देवबंद या ठिकाणी आजाद यांच्या कारवर  सायंकाळी हा हल्ला झाला असून कारमधून आलेल्या काहीअज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांच्या कंबरेला एक गोळी घासून गेली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या हल्ल्याचे पडसाद देशासह राज्यभरात उमटले असून राज्यात भीम आर्मीसह विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
अॅड चंद्रशेखर आजाद यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना त्वरीत अटक करण्यासह आजाद यांना व्ही आय पी दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी राज्यभरात निदर्शने आंदोलने सुरू झाली आहेत. 

सदर हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत दादर पूर्व स्वामी नारायण मंदीरासमोर उद्या गुरूवार दिनांक २९ जून रोजी दुपारी ३ वाजता निदर्शने करण्यात येणार असून  यावेळी शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. भीम आर्मी सह आजाद यांच्यावर प्रेम करणा-या विविध संस्था संघटना व जनतेने यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांनी केले आहे.

रामदास आठवलेंनी केला निषेध -
सहारनपूर मधील देवबंद येथे भीमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हल्लेखोरांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी, या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, याप्रकरणी आपण लवकरच उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची भेट घेणार आहोत, एका दलित नेत्यावर जीवघेणा हल्ला होणे ही गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेवरचा हा  हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रिय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad