Train accident : ओडिशा रेल्वे दुर्घटनेत २३३ मृत्यू, ९०० जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2023

Train accident : ओडिशा रेल्वे दुर्घटनेत २३३ मृत्यू, ९०० जखमी


भुवनेश्वर (ओडिशा) - ओडिशामध्ये बलासोर येथे रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. त्यामध्ये किमान २३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचावकार्य करत आहे. या पार्श्वभूमिवर ओडिशा सरकारने आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

शुक्रवारी (2 मे) सायंकाळी हा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. ओदिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 3 गाड्यांचा अपघात झालाय. आधी हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांवर आदळली आणि नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस मागून आली, त्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. कोरोमंडल एक्सप्रेसच्या 7 बोगींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

पंतप्रधान यांनी व्यक्त केले दुःख - 
ओडिशामध्ये  रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख  व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"ओडिशात झालेल्या  रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो. या दुःखद  प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी  मदत केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad