Mumbai News - नव्या प्रणालीद्वारे मध्य रेल्वेची १५ कोटींची बचत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 June 2023

Mumbai News - नव्या प्रणालीद्वारे मध्य रेल्वेची १५ कोटींची बचत


मुंबई - मध्य रेल्वेने शाश्वततेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ट्रेनसाठी पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्यायांचा अवलंब केला आहे. हेड ऑन जनरेशन्स (एचओजी) तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने मध्य रेल्वेच्या खर्चात कमालीची बचत झाली आहे. उर्जेसाठीचा खर्च कमी झाल्याने मध्य रेल्वेच्या महिन्याच्या खर्चात १५ कोटी रुपयांची बचत झाली असून जवळपास ५,५०० टन कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही कमी झाले आहे. मध्य रेल्वेच्या १७० पैकी ९५ रेक हे एचओजीने स्वयंचलित झाले असून आता सर्व रेक एचओजीनुसार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन होण्यापाठोपाठ खर्चातही बचत होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

अद्ययावत अशा हेड ऑन जनरेशन्स तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने, सध्या मध्य रेल्वेकडून ५७ मेल/एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत. त्यामुळे शाश्वत उर्जेची बचत होऊन त्याद्वारे स्वच्छ भवितव्याच्या दिशेने मध्य रेल्वेने वाटचाल सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते, लोकोमोटिव्ह फिटेड विथ हॉटेल लोड कनव्हर्टर या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या एचओजी तंत्रज्ञानाद्वारे, थेट ओव्हरहेड विद्युत पुरवठ्याद्वारे मेल/एक्स्प्रेसला उर्जा पुरवली जात आहे. या नावीन्यपूर्ण संकल्पनेमुळे उर्जेची बचत, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध झाला आहे. यापूर्वी लाइटिंग, फॅन्स, एसी, पँट्री कार उपकरणांना डिझेल जनरेटरद्वारे उर्जा पुरवली जात होती. एचओजी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मध्य रेल्वेने प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने पाऊल उचलले असून प्रवाशांनाही प्रवास करताना त्याचा चांगला अनुभव येत आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक ट्रेनमध्ये प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेतही वाढ झाली आहे.

सद्यस्थितीत, मध्य रेल्वेकडून १४३ डब्ल्यूएपी७ लोकोमोटिव्ह हॉटेल लोड कन्व्हर्टरचा वापर केला जात आहे. मध्य रेल्वेच्या ५७ ट्रेनसाठी हेड ऑन जनरेशन्स हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. मात्र वीजपुरवठा खंडित झाल्यास, जनरेटरचा पर्यायही ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad