Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

घाटकोपरमध्ये घर कोसळून ४ जखमी


मुंबई - घाटकोपरमध्ये काल एक बंगला कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथील एक दुमजली घर कोसळले आहे. यात चार जण जखमी झाले आहेत.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्व येथे रमाबाई आंबेडकर नगर आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूला चाळ नंबर २१ आहे. या चाळीतील दुमजली घर सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळले. ढिगाऱ्याखाली चार जण अडकले होते. त्यांना ढिगाऱ्याखालून काढून पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. महादेव खिलारे ५० वर्ष ,सुनिता खिल्लारे ४२ वर्ष, रोहित खिल्लारे २३ वर्ष, वैभव खिल्लारे २० वर्ष अशी जखमींची नावे आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom