राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस; ८५ टक्के पेरण्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2023

राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस; ८५ टक्के पेरण्या


मुंबई - राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. (104percent of the average rainfall in the state)

राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे.
सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे. जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad