मुंबईमधून ६ हजार किलोचा लोखंडी पूल चोरी झाला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2023

मुंबईमधून ६ हजार किलोचा लोखंडी पूल चोरी झाला


मुंबई - मालाड (पश्चिम) येथील नाल्यावर अदानी ग्रुपच्या कंपनीकडून लोखंडी पूल बसवण्यात आला होता. हा ६ हजार किलोचा लोखंडी पूल २६ जून रोजी चोरीला गेल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी वेळेत तपास करून या घटनेचा छडा लावला असून यासंबंधित ४ आरोपींना अटक केली आहे.

तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की हा पूल ६ जून रोजी शेवटचा दिसला होता. घटनास्थळी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ह कॅमेरे शोधून या घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासात ११ जून रोजी एक मोठे वाहन पुलाच्या दिशेने गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे त्याचा शोध घेतला. पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, वाहनात गॅस कटिंग मशिन होती ज्याचा उपयोग पूल तोडण्यासाठी करण्यात आला होता.

चोरीला गेलेला लोखंडी पूल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अदानी इलेक्ट्रिसिटीने मोठ्या प्रमाणावर विद्युत तारा वाहून नेण्यासाठी हा ९० फूट पूल बांधला होता. काही महिन्यांपूर्वी त्या नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधण्यात आल्यावर ती तात्पुरती रचना अन्यत्र हलवण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad