यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
राज्य शासनाने दिलेल्या ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास व महिलांसाठी तिकिट दरात ५० टक्के सवलत या दोन योजनांमुळे यंदा मागिल वर्षाच्या तुलनेत ७ कोटी ६९ लाख रुपये उत्पन्न अधिक मिळाले तर प्रवाशी संख्या २ लाख ४५ हजार ६७० ने वाढली. "प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहील"असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, शेखर चन्ने यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment