नव्या बस खरेदीसाठी 3,419 कोटी रुपये द्या, बेस्टची पालिकेकडे मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2023

नव्या बस खरेदीसाठी 3,419 कोटी रुपये द्या, बेस्टची पालिकेकडे मागणी


मुंबई - बेस्ट उपक्रमाने 2,237 बस खरेदी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे 3,419 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहिले आहे.

11 जून 2019 रोजी बेस्ट वर्कर्स युनियनसोबत झालेल्या सामंजस्य करारातील क्रमांक 3 नुसार, त्यांच्या ताफ्यात 3,337 बसेसची आवश्यकता आहे. वयोमर्यादा झाल्याने बेस्टने आपल्या ताफ्यातून मार्चच्या अखेरीस 1,696 बसेस काढून टाकल्या आहेत. या आर्थिक वर्षात आणखी 541 बस ताफ्यातून काढल्या जाणार आहेत. यामुळे बेस्टला 2,237 नवीन बस खरेदी करावी लागणार असल्याचे पत्रात अधोरेखित केले आहे. 

बेस्टच्या सन 2022-23 अर्थसंकल्पात 1,696 इलेक्ट्रिक बसेससाठी 2,58,391.25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर 541 इलेक्ट्रिक बसेससाठी 2023-24 (बजेट) मध्ये 83,552.75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.असे पत्रात म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी बेस्टचा ताफा ३,५०० बस इतका होता. तो ताफा सध्या ३,१०० वर आला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad