सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध, दीडशे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2023

सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध, दीडशे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना


सांगली - सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग गावात उभारण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आली. कमानिला डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याला  विरोध करण्यात आला आहे. ग्रामपंचायत आंबेडकरी जनतेच्या विरोधात असल्याने सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लॉन्ग मार्च करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 

सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे दलित समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती.बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती.मात्र, १६ जून रोजी कामन बेकादेशीर असल्याचं ठरवत,ग्रामपंचायतीनं बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली.यानंतर जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमींनी याला विरोध केला होता. बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते.त्यानंतर कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत बेडग ग्रामस्थांसह जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते.

प्रशासनाकडून सरपंच उमेश पाटील यांच्यासह संबंधितांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमान उभारु दिली जात नाही, त्याला विरोध होतोय आणि न्याय मिळत नाही,या भावनेतून बेडग ग्रामस्थांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं.

दलित समाजातील कुटुंबांनी आता या प्रश्नी गाव सोडले आहे. सांगलीमध्ये न्याय मिळत नाही, न्याय मिळावा म्हणून आता थेट मुंबईकडे हे दलित बांधव लॉंग मार्च काढत निघाले आहेत. मुलं-बाळ, जनावरं,संसार उपयोगी साहित्य घेऊन गाव सोडून मंत्रालयाकडे चालत रवाना झाले आहेत. बेडग गावातून दुसऱ्या गावात पुनर्वसन करावं, अशी मागणी देखील डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर स्वागत कमान बचाव कृती समिती, सांगलीचे महेश कांबळे यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad