भाजपशासित राज्यात दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा अपमान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 July 2023

भाजपशासित राज्यात दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा अपमान


मुंबई / नवी दिल्ली - भाजपशासित राज्यात दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा अपमान होत आहे. मध्य प्रदेशात एका महिन्याच्या आत दलित-आदिवासी अत्याचाराची दुसरी अत्यंत निंदनीय आणि वेदनादायक घटना घडली, जी मानवतेला लाजवेल अशी आहे. छतरपूर जिल्ह्यातील या घटनेवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

खर्गे म्हणाले की, एनसीआरबी-२०२१ नुसार, भाजपशासित मध्य प्रदेशात दलित आणि आदिवासींविरुद्ध सर्वाधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशात दररोज सातहून अधिक गुन्हे दलित आणि आदिवासींवर दाखल होत आहेत. त्यांनी दावा केला की, मध्य प्रदेशातील दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय नागरिक अनेक दशकांपासून भाजपच्या कुशासनात अपमान सहन करत आहेत.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका दलित व्यक्तीने आरोप केला आहे की, एका व्यक्तीला चुकून हाताने स्पर्श झाल्यामुळे दुसऱ्या जातीतील एका व्यक्तीने त्याचा चेहरा आणि शरीरावर मानवी मलमूत्र मळले. एका पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांना शनिवारी सांगितले की, छतरपूर घटनेच्या संदर्भात, आरोपी राम कृपाल पटेल याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक न्यायाचे स्वप्न भंग -
खर्गे महणाले की, भाजपचा सबका साथ, केवळ जाहिरातींमध्ये बंदिस्त असून दिखाऊ घोषणा आणि जनसंपर्क स्टंट आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे स्वप्न भाजप दररोज भंग करत असल्याचा त्यांनी आरोप केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad