Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

इर्शाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळली, बचाव कार्य सुरू


मुंबई / कर्जत - रायगड (Raigadh) जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या (Irshalgadh) पायथ्याशी असलेल्या 
आदिवासी पाड्यावर मोठी (landslide) दरड कोसळली. 19 जुलैच्या रात्री सुमारे 11 ते 11.45 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्री सर्वजण झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली शंभरहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 75 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये चार ते सहा लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला आहे. 

इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या वाडीतील ९० टक्के घरे ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. पाऊस असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत परंतु बचावकार्य सुरू आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. दुर्घटना झाल्यानंतर काही लोक घाबरून जंगलात पळाले आहेत. ते परतल्यानंतरच वाडीतील नक्की किती जण या दरडीखाली अडकलेले असू शकतात, याबाबतची नेमकी माहिती मिळेल, असं आपत्कालीन बचाव पथकाच्या एका सदस्याने सांगितलं आहे. खोपोली नगरपरिषद आणि पनवेल महापालिकेची मदतपथके औषधे आणि बिस्कीटे, पाणीबाटल्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल, एनडीआरएफ पोलीस आणि ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन,उद्योग मंत्री तथा पालक मंत्री उदय सामंत, घटनास्थळावर दाखल झाले आहेत. पहाटेच मंत्री दादाजी भुसे यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनस्थळी पोहचले आहेत, त्यांनी दुर्घटनेचा आढावा घेतला, तसेच NDRF ची टीम, तथा TDRF ची टीम युध्दपातळीवर बचाव कार्य करत आहे. मृत्यू पावलेल्या मध्ये एक अग्निशमनचा जवान आहे, मदतकार्य करण्याकरिता डोंगर चढताना त्याला हार्टअटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला.

कंट्रोल रूम - 
आज रोजी खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी API. काळसेकर  यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर 8108195554 असा आहे.

ठाण्याची TDRF टीम - 
दिनांक १९ जुलै २०२३ रोजी २३:४५ वाजताच्या सुमारास इसलवाडी, चौक - मानवली गाव,   तालुका - खालापूर, जिल्हा - रायगड याठिकाणी गावातील काही घरांवर दरड कोसळली आहे.  मातीच्या ढीगाऱ्या खाली अंदाजे ७० ते ८० नागरिक अडकले असून सद्यस्थितीत एकूण ०८ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरीत लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे खालापूर तहसिल कार्यालयाकडून माहिती मिळाली. घटनास्थळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित असून आपल्या ठाणे महानगरपालिका मार्फत ठाणे प्रतिसाद दल (TDRF टीम) मदतीसाठी पाठवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा - 
खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत. प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज  आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom