सातारा फलटणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सातारा फलटणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Share This

सातारा - साता-यात फलटणमधील कुरवली खुर्द येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. माय-लेकीला संपूर्ण गावासमोर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघींचे कपडेही फाटले. त्या दोघींना फरफटत नेल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे. मुलांच्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुरवली खुर्द येथे काल सायंकाळी माय-लेकीला मारहाण केली गेली. यावेळी दोघींना फरफटत नेण्यात आले आणि यात त्यांचे कपडेही फाटले. संबंधित महिला विधवा असून तिची मुलगी १६ वर्षांची आहे. घटनेनंतर माय-लेकींची तक्रारही पोलिसांत घेतली नसल्याचा आरोप केला जात आहे. फलटण पोलिसांनी सकाळी पीडित महिलेसह मुलीला पोेलिस ठाण्यात आणले. पोक्सा आणि अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत मारहाण करणा-यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

शाळकरी मुलांमध्ये क्रिकेटच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्याच वादातून ही मारहाणीची घटना घडली असल्याचे महिलेचे आणि तिच्या मुलीचे म्हणणे आहे. पोलिसांनीही मुलांमधील वादाचे पर्यवसान महिलांच्या भांडणात झाल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages