रामदास आठवले यांनी घेतली अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2023

रामदास आठवले यांनी घेतली अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट


मुंबई - महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन केले.

अजितदादा पवार भाजप शिवसेना रिपाइं महायुती सोबत आल्यामुळे आमच्या महायुतीची ताकद अधिक वाढली आहे. राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपण आज अजितदादा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. अजितदादा पवार आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणताही वाद नसल्याचे पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad