11 महिन्यात 1.14 लाख पत्रांवर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कार्यवाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

11 महिन्यात 1.14 लाख पत्रांवर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कार्यवाही

Share This

मुंबई - महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सामान्य नागरिक, अति महत्वाचे व्यक्ती आणि शासकीय नस्ती याच्या निपटारा केलेली आकडेवारी 1.14 लाख असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis acted on 1.14 lakh letters in 11 months)

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सामान्य नागरिक, अति महत्वाचे व्यक्ती आणि शासकीय नस्तीबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली होती. उप मुख्यमंत्री कार्यालयाने अनिल गलगली यांना पाठविलेल्या उत्तरात आकडेवारी दिली आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारल्यापासून निपटारा केलेल्या व्हीआयपी टपाल आणि पत्रव्यवहाराची संख्या 32,508 आहे. तसेच निपटारा केलेल्या जनरल टपाल आणि पत्रव्यवहाराची संख्या 74,703 आहे तर निपटारा केलेल्या नस्तीची संख्या 7176 आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 रोजी उप मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. मागील 11 महिन्याची आकडेवारी दिली असून एकूण 1 लाख 14 हजार 414 पत्र, नस्ती याचा निपटारा केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages