बेस्ट संप - सर्व सार्वजनिक सेवा वाहनांतून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 August 2023

बेस्ट संप - सर्व सार्वजनिक सेवा वाहनांतून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी


मुंबई - विविध मागण्यांसाठी बी.ई.एस.टी. (बेस्ट ) कामगार ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक ३ ऑगस्ट २०२३ पासून बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले आहे. या संपामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये, यास्तव प्रस्तावित आंदोलनाच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे. मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून उदा. सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस, स्कूल बसेस आदींमधून प्रवाशांच्या वाहतूकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. अशाप्रकारची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली आहे. 
   
मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ च्या ५९) चे कलम ६६ थे उपकलम (३) च्या खंड (एन) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने ही अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेद्वारे मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून म्हणजेच पी एस व्ही सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस, स्कूल बसेस आदींमधून प्रवाशांच्या वाहतूकीस संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास शासन परवानगी देत आहे. संप मागे घेतल्यास सदर अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे गृह (परिवहन) विभागाचे कार्यासन अधिकारी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad