बेस्टच्या १८ डेपोतील कंत्राटी कर्मचारी संपावर, प्रवाशांचे हाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2023

बेस्टच्या १८ डेपोतील कंत्राटी कर्मचारी संपावर, प्रवाशांचे हाल


मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमातील कंत्राउतरल्याने टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात बहुसंख्य कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे १८ बस डेपोमधून एकही खासगी एसी बस रस्त्यावर उतरली नाही. भाडे तत्त्वावरील तब्बल १,६७१ पैकी १,३७५ बसगाड्या रस्त्यावर उतरल्या नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.    

आज 4 ऑगस्ट 2023 रोजी खाजगी बस पुरवठा कंत्राटदार यांच्या कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनास्तव सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 1375 बस गाड्या प्रवर्तित झाल्या नाहीत. आजच्या आंदोलनात SMT, मातेश्वरी, टाटा, हंसा, ओलेक्ट्रा, आणि switch या व्यवसाय संस्थेच्या कामगारांचा समावेश आहे. कामबंद आंदोलनामुळे बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतिक्षा नगर, आणिक, धारावी, काळाकिल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे अश्या एकूण 20 आगारांच्या बस गाड्या प्रवर्तनावर फरक पडला. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये एकूण स्वतःच्या मालकीच्या 1390 आणि wet lease च्या 1671 अशा एकूण 3061 बस गाड्या आहेत.

बेस्ट प्रशासन आर्थिक अडचणीत सापडले आहे. खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही.

एसटीची बेस्ट ला मदत..
बेस्टमध्ये अचानक कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने त्यांच्या अनेक बसेस रद्द करण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्ट ने या संदर्भात एसटी कडे जादा बसेस सोडण्याची मागणी केली. त्यानुसार आज पासून बेस्टच्या ६ डेपोला प्रत्येकी २५ याप्रमाणे १५० बसेस एसटीने पुरविलेल्या आहेत. बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत सदर बसेस बेस्टच्या ताटामध्ये सेवा देतील अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad