2026 पर्यंत मुंबईच्या 5 एन्ट्री पॉइंटवर टोल वसुली सुरूच राहणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 August 2023

2026 पर्यंत मुंबईच्या 5 एन्ट्री पॉइंटवर टोल वसुली सुरूच राहणार


मुंबई - मुंबईतील 31 फ्लाईओवर पूलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या 5 प्रवेश नाक्याचे कंत्राट अवघ्या 2242.35 कोटी रुपयांना एमईपी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीस दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएसआरडीसीने दिली आहे. वर्ष 2026 पर्यंत मुंबई टोलमुक्त होऊ शकते कारण तोपर्यंत मुंबईतील 5 एन्ट्री पॉइंटवर टोल वसूल करण्याचा अधिकार आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईच्या पाच प्रवेश नाक्यावर वसूल केल्या जाणा-या टोल वसूली बाबत वर्ष 2016 मध्ये माहिती मागितली होती. एमएसआरडीसीनी अनिल गलगली कळविले की वर्ष 2010-11 पूर्वी एमएसआरडीसी स्वत: टोल वसूल करत होती. वर्ष 1999-2000 मध्ये रु 28.35/- कोटी, वर्ष 2000-2001 मध्ये रु 56.57/- कोटी, वर्ष 2001-2002 मध्ये रु 65.12/- कोटी, वर्ष 2002-2003 मध्ये 476.84/- कोटी, वर्ष 2008-2009 मध्ये 68.65/- कोटी आणि वर्ष 2009-2010 मध्ये 231.39/- कोटी वसूल केले होते तर वर्ष 2003-2004 ते वर्ष 2007-2008 या 5 वर्षाची आकडेवारी एमएसआरडीसी उपलब्ध नाही. वर्ष 2010-2011 मध्ये एमईपी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीस दिनांक 19 नोव्हेंबर 2026 पर्यंत टोल वसुलीचे कंत्राट दिले गेले असून त्याबदल्यात एमएसआरडीसीने रु 2242.35/- कोटी एकरक्कमी घेतली आहे. वर्ष 1999-2000 पासून वर्ष 2015-2016 या 17 वर्षात 119 कोटी 44 लाख 5 हजार 750 रुपये मेंटेनेंसवर खर्च केले आहेत.
 
एमएसआरडीसीने अनिल गलगली यांस कळविले आहे की मुंबईतील 31 फ्लाईओवर वर एमएसआरडीसीने 1058 कोटी 34 लाख 66 हजार 885 रुपये खर्च केले असून त्याचा खर्च मुंबईतील 5 प्रवेश नाक्यावर टोल नाका बनवून वसूल केला जात आहे. वेस्टर्न कॉरिडोरवर 228 कोटी 79 लाख 95 हजार 916 रुपये खर्च झाले असून त्यात आरे गोरेगाव, दत्तपाडा, जीएमएलआर, जयकोच,कालीना- वाकोला, माहिम, नेशनल पार्क आणि रानी सती मार्ग या 8 फ्लाईओवरचा समावेश आहे. ईस्टर्न फ्लाईओवर अंतर्गत 241 कोटी 40 लाख 99 हजार 450 रुपये हे छेडानगर, एजीएलआर, सीएसटी- कुर्ला, जीएमएलआर, गोल्डन डाइज, जेवीएलआर, नितिन कास्टिंग एंड कैडबरी, सायन आणि विक्रोळी फ्लाईओवरच्या बांधकामावर खर्च केले आहेत. ऐरोली फ्लाईओवरच्या बांधकामावर 173 कोटी 57 लाख 55 हजार आणि 891 रुपये खर्च केले आहेत तर एलबीएस वरील कांजूरमार्ग, जेवीएलआर- गांधीनगर, जेवीएलआर- साकीविहार या फ्लाईओवरच्या बांधकामावर 126 कोटी 91 लाख 21 हजार 889 रुपये खर्च झाले आहेत. मुंबई शहरातील जेजे हॉस्पिटल, एन एम जोशी आणि सेनापती बापट मार्ग या फ्लाईओवरच्या बांधकामावर 144 कोटी 81 लाख 50 हजार 864 रुपये एमएसआरडीसीने खर्च केले आहेत. सायन पनवेल कॉरिडोर अंतर्गत 142 कोटी 83 लाख 42 हजार 876 रुपये बीएआरसी, चेंबूर-मानखुर्द लिंक रोड, खारघर,कोकण भवन, नेरुळ, तलोजा, वाशी या फ्लाईओवरच्या बांधकामावर आणि कोकण भवन येथील अंडरपासच्या रुंदीकरणावर खर्च केले आहे. 

अनिल गलगली यांच्या मते यापैकी काही फ्लाईओवर वर्ष 2000 च्या पूर्वीचे असून बांधकाम खर्च सरकारी तिजोरीतून झाला असताना टोल वसूली का केली जात आहे आणि एमईपी सारख्या खाजगी कंपनीस टोल मार्फत नफा कमविण्यास प्रोत्साहन दिले जाते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण आता पूर्व आणि पश्चिम या दोन्ही द्रुतगती मार्गाची देखभाल महापालिका करत आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ऑडिट करून 2026 नंतर मुंबई टोलमुक्त करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad