कुर्ल्यातील इमारतीला आग, ३९ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2023

कुर्ल्यातील इमारतीला आग, ३९ जखमी


मुंबई - कुर्ला कोहिनूर रुग्णालयासमोरील (Kohinoor Hospital) एका इमारतीला आग लागली. या आगीच्या (Fire) धुरामुळे श्वसनाचा त्रास झाल्याने ३९ जण जखमी झाले आहेत. या रुग्णांवर राजावाडी (Rajawadi Hospital) आणि कोहिनूर रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. 

कुर्ला पश्चिम येथे कोहिनूर रुग्णालय आहे. या रुग्णालयासमोर एसआरए ची ७ क्रमांकाची इमारत आहे. या इमारतीमधील सी विंग मध्ये १६ सप्टेंबरच्या रात्री १२.१५ वाजता आग लागली. आगीमुळे ५० ते ६० रहिवासी इमारतीत अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. ३९ जणांना आगीच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. त्यामधील ३५ जणांना पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ४ जणांवर कोहिनूर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad