मुंबई - घाटकोपर पूर्व विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती (water pipeline leakage) लागली आहे. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने घाटकोपर पूर्व विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालिकेची अंधेरी घाटकोपर लिंक रोड वरील ६०० मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनला आज (१५ सप्टेंबर) रात्री गळती लागली. यामुळे घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मी नगर, लक्ष्मी बाग, नायडू कॉलनी, ९० फूट रस्ता, पंतनगर पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पाईपलाईनला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment