पृथ्वीजवळून वेगाने गेला लघुग्रह - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2023

पृथ्वीजवळून वेगाने गेला लघुग्रह


वॉशिंग्टन - पृथ्वीजवळून वेळोवेळी अनेक लघुग्रह जात असतात. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. त्याला ‘अस्टेरॉईड बेल्ट’ असे म्हटले जाते. यामध्ये अनेक लहान-मोठ्या आकाराचे लघुग्रह आहेत. त्यामधीलही काही लघुग्रह पृथ्वीजवळून जात असतात. शुक्रवारीही एक लघुग्रह अतिशय वेगाने पृथ्वीजवळून पुढे निघून गेला.

2023 एसई 4’ असे या लघुग्रहाचे नाव आहे. 29 सप्टेंबरला हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जात असताना तो दोन दशलक्ष किलोमीटर अंतरावर होता. त्यावेळी त्याचा वेग सुमारे 16662 किमी प्रतितास इतका होता, अशी माहिती ‘नासा’ने दिली आहे. नासाच्या माहितीनुसार हा लघुग्रह 45 फूट रुंद असून एखाद्या घराइतका त्याचा आकार आहे. पृथ्वीच्या इतक्या जवळून जाणारा हा पहिला लघुग्रह नसून यापूर्वी एक लघुग्रह 1965 मध्ये पृथ्वीपासून 4.1 दशलक्ष किमी इतक्या अंतरावरून गेला होता. आता 2061 मध्ये हाच लघुग्रह पुन्हा एकदा पृथ्वीच्या जवळून जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS