जपानने पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधला ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2023

जपानने पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधला !


जपान / टोकियो - अंतराळात पृथ्वीसारखे (Earth) ग्रह शोधण्यासाठीही जगभरातील शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे. आता शास्त्रज्ञांनी अंतराळात दुसरी पृथ्वी शोधली आहे. जपानच्या (Japan) शास्त्रज्ञांनी अंतराळात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधल्याचा दावा केला आहे. जपानच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाच्या अहवालानुसार हा ग्रह आपल्याच सूर्यमालेत असून तो पृथ्वीप्रमाणे आहे. या गृहाचे पृथ्वीपासूनचे अंतर ४.५ अब्ज किलो मीटर आहे. (Japan discovered another planet like Earth)

जपानच्या वैज्ञानिकांच्या मते, आपल्या सूर्यमालेत ८ नाही तर ९ ग्रह आहेत. हा नववा ग्रह पृथ्वीप्रमाणे आहे. प्लुटोपासून ग्रहाचा दर्जा हटविल्यानंतर आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची संख्या ८ झाली होती. त्यानंतर आता जपानच्या शास्त्रज्ञांनी नवव्या ग्रहाचा शोध लावला आहे. जपानच्या शास्त्रज्ञांच्या या दाव्यानंतर आता खरोखरच दुसरी पृथ्वी सापडली आहे का आणि त्या ग्रहावरही पृथ्वीप्रमाणे राहता येईल का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

जपानी खगोलशास्त्रज्ञांच्या नवीन रिपोर्टनुसार नववा ग्रह आपल्या सूर्यमालेतच आहे. हा ग्रह क्विपर बेल्टमध्ये लपलेला आहे. सूर्यमालेतील शेवटचा ग्रह नेपच्यून ओलांडला की तिथून क्विपर बेल्ट सुरू होतो. हा पट्टा गोल आकाराचा आहे, जो संपूर्ण सूर्यमालेला घेरतो. क्विपर बेल्टमध्ये लाखो लघुग्रह आहेत, जे बर्फाने झाकलेले आहेत. सूर्यमालेच्या निर्मितीदरम्यान उरलेले तुकडे क्विपर बेल्टमध्ये आहेत.

टोकियोच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेच्या या नवीन संशोधनाचा अहवाल द अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार त्यांनी सांगितले आहे की, आम्हाला पृथ्वीसारख्या ग्रहाच्या अस्तित्वाची शक्यता दिसत आहे. क्विपर बेल्टमध्ये ग्रह असण्याची शक्यता आहे. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळापासून असे ग्रह अस्तित्वात आहेत.

नवीन ग्रहाचे नाव क्विपर बेल्ट प्लॅनेट -
जपानी शास्त्रज्ञांनी नवीन ग्रहाचे नाव क्विपर बेल्ट प्लॅनेट असे ठेवले आहे. क्विपर बेल्ट हा ग्रह पृथ्वीपासून ४.५ अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. तज्ज्ञांच्या मते, क्विपर बेल्ट प्लॅनेट पृथ्वीपेक्षा तीनपट मोठा आहे. पण येथील तापमान इतके कमी आहे. जपानमधील ओसाका येथील किंदाई विद्यापीठातील पॅट्रिक सोफिया लिकावाका आणि टोकियोच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेने हा अभ्यास केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad