MPSC च्या ‘या’ परीक्षा ऑफलाइन पद्धतीने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2023

MPSC च्या ‘या’ परीक्षा ऑफलाइन पद्धतीने


पुणे - राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या तरूणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षे संदर्भात एक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेतल्या जात होत्या. मात्र, यात या परीक्षा पूर्वी प्रमाणे ऑफलाइन (Offline exam) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

आतापर्यंत घेण्यात आलेल्या सरळसेवा भरतीच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे या परीक्षांवर आणि एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तलाठी भरती परीक्षेतही हा घोळ पुढे आला आहे. त्यामुळे एमपीएससीने प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीनेच परीक्षा घ्यावी अशी मागणी केली जात होती. अखेर एमपीएससीने उमेदवारांची मागणी मान्य केली असून महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या दोन परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

एमपीएससीने या निर्णयाबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे गुरुवारी दिली असून या निर्णयाचे स्वागत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी केले आहे. एमपीएससीने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र आता या परीक्षांच्या नियोजनात बदल करण्यात आले आहे. प्रशासकीय कारणास्तव या दोन्ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या दोन्ही परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. ही परीक्षा घेतांना पदसंख्या, आरक्षणात काही बदल झाल्यास त्याची माहिती देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS