2019 च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता मिळवून देणार – रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2023

2019 च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता मिळवून देणार – रामदास आठवले


मुंबई - सन 1985 त्यानंतर 1990 पासून सन 2000 आणि आता 2011 पर्यंतच्या झोपड्यांना रिपब्लिकन पक्षाच्या प्रयत्नामुळे; केलेल्या संघर्षामुळे अधिकृत मान्यता मिळालेली आहे. सन 2019 च्या निवडणुकित ज्या झोपडीधारकांनी मतदान केले आहे त्यांच्या झोपड्यांना शासनाची अधिकृत मान्यता मिळवून देणार अशी भिमगर्जना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज केली. बांद्रा पूर्व येथील एम आय जी क्लब येथे रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष सुमित वजाळे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सत्कार समारंभात आठवले बोलत होते.

रिपब्लिकन पक्षाने झोपडी वासियांना वेळोवेळी न्याय मिळवून दिला आहे. भूमिहिन शेत मजुरांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा राहिला आहे. 14 एप्रिल 1990 च्या शासन निर्णयानुसार हजारो भूमिहिनांच्या नावावर गायरान जमिनीचे पट्टे करुन देण्यात आले. भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी 14 एप्रिल 1990 च्या शासन निर्णयाची पात्रतेची कालमर्यादा 10 वर्षाने वाढवून सन 2000 पर्यंत चे गायरान जमिनी वरील दलितांची भूमिहिनांची अतिक्रमण नियमित करावे यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्नशिल राहणार आहे आणि या कामात सुमित वजाळे सारख्या अभ्यासू कार्यकर्त्याने केलेल्या कामाची दखल घेऊन सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी वजाळे सारखे काम करावे. एखाद्या सामाजिक विषयात लक्ष देऊन अभ्यासूवृत्तीने त्या क्षेत्रातील प्रश्न सोडवावेत असे आवाहन आठवले यांनी केले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे,सुरेश बारसिंग,श्रीकांत भालेराव,बाळासाहेब गरुड,रमेश गायकवाड,प्रकाश जाधव,साधु कटके,बेला मेहता,उषा रामलु,अभया सोनावणे,रेश्मा खान,हरिहर यादव,भिमराव कांबळे,यशवंत नडगम आदि अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad