Aadhar Card - आधार जन्म-मृत्यू नोंदणीशी जोडले जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 October 2023

Aadhar Card - आधार जन्म-मृत्यू नोंदणीशी जोडले जाणार


नवी दिल्ली - भारतीय नागरिकांच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार लार्डला मान्यता आहे. याच आधार कार्डमधील बायोमेट्रिक माहिती लिक होण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची भीती असते. मृत व्यक्तीच्या आधार क्रमांकाचा गैरवापर होण्याची अधिक भीती होती. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर जन्म-मृत्यू नोंदणीचा सुधारित कायदा लागू झाला आहे. यामुळे मृतांचा आधार डेटा निष्क्रिय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजेच मृताच्या डेटाचा दुरुपयोग आता होणार नाही. तसेच मतदार यादीतूनही मृताचे नाव डिलिट करण्यास मदत मिळणार आहे. 

वस्तुत: मृत्यू नोंदणी व आधार यांच्यात संबंध नसल्याने आधार संपवण्याची आतापर्यंत कोणतीच ठोस व्यवस्था नव्हती. अशा वेळी आधार डेटाचा दुरुपयोग कसा थांबवता येईल, हे आव्हान सरकार व मृतांच्या कुटुंबीयांसमोर होते. जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात बदलाच्या दुरुस्ती विधेयकाचे प्रारूप तयार करताना जनगणना रजिस्ट्रार जनरलने यूआयडीएआयकडून सूचना मागवल्या होत्या. जन्म-मृत्यू अधिनियम १९६९ मध्ये दुरुस्तीनंतर आता या नोंदणीचा रेकॉर्ड रियल टाइममध्ये केंद्रीय पातळीवरही अपडेट होईल. जन्म प्रमाणपत्र आधारशी जोडण्याची व्यवस्था २० राज्यांत लागू केली आहे.

आता मृत्यू प्रमाणपत्र आधारशी जोडल्याने मृताचा डेटा निष्क्रिय केला जाऊ शकेल. देशात आतापर्यंत १३६ कोटी आधार कार्ड जारी करण्यात आलेले आहेत. त्यापैकी सुमारे ६ कोटी आधारधारकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशभरात कोठेही मुलाचे जन्म झाल्यास किंवा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास, याची नोंद जन्म-मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात करणे आवश्यक आहे. खेड्यातील ग्राम पंचायत कार्यालयात आणि आपले घर शहरी भागात असल्यास, नगरपालिका, नगर परिषद किंवा महानगपालिकेच्या कार्यालयात नोंदणी करु शकता.

अतिरेकी कारवायांतून बचाव होणार -
डेटाच्या दुरुपयोगाची शक्यता कायम असते. याचे परिणाम मृताच्या कुटुंबीयांनाही भोगावे लागू शकतात. यामुळे व्यक्तीची ओळख व पत्ता बेकायदेशीर कामांत वापरला जाऊ शकतो. आर्थिक फसवणूक यात प्रमुख आहे. आधार कार्डद्वारे फोनचे सिम कार्डही मिळवले जाऊ शकतात. तसेच बेकायदेशीररीत्या अतिरेकी कारवायांतही त्याचा वापर केला जाऊ शकतो.

नोंदणी कायदा काय सांगतो? -
जन्म आणि मृत्यूची नोंदणी अधिनियम १९६९ अंतर्गत नमूद करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या रजिस्ट्रारला जन्म किंवा मृत्यूच्या अहवालात मागितलेल्या इतर तपशीलांसह आधार क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी ऐच्छिक असणार नाही. मात्र, तुम्हाला जर आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली जाईल. आधार जन्म नोंदणी ही मुलाची ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते, जन्माच्या बाबतीत पालक आणि माहिती देणारा आणि जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या बाबतीत पालक, जोडीदार आणि माहिती देणा-याची ओळख स्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते असे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad