खुल्या जागेचे धोरण रद्द न केल्यास काँग्रेस न्यायालयात जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 October 2023

खुल्या जागेचे धोरण रद्द न केल्यास काँग्रेस न्यायालयात जाणार


मुंबई -  मुंबईत असलेल्या खुल्या जागा आंदण देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले धोरण चुकीचे आणि घटना विरोधी असून ते धोरण रद्द न केल्यास मुंबई काँग्रेस न्यायालयात जाईल, असा निर्धार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला. त्या मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थेच्या बैठकीत बोलत होत्या.

मुंबई काँग्रेस तर्फे शुक्रवारी आझाद मैदान येथील मुंबई विभागीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मुंबईत असलेल्या खुल्या जागेबाबत विविध स्वयंसेवी संस्थाना पाचारण करण्यात आले होते. यात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, वन शक्तिचे स्टॅलिन दयानंद, रोहित जोशी, संजीव वाल्सन, ब्रायन आदी उपस्थित होते. मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवि राजा यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली आणि मागील 8 वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सर्व खुल्या जागा आणि उद्याने पालिकेनेच परिरक्षण करण्यावर जोर दिला. वनशक्तिचे स्टॅलिन दयानंद यांनी मुंबईतील अज्ञात असलेल्या वनांची माहिती देत त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. माजी खासदार संजय निरुपम यांनी वांद्रे पश्चिम येथे एक विशाल निर्दशने स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून करण्याची सूचना केली तर माजी खासदार प्रा. भालचंद्र मुणगेकर यांनी अन्य देशांप्रमाणे शासनाने खुल्या जागा सांभाळ करण्यावर जोर दिला. सरतेशेवटी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि माजी मंत्री प्रो. वर्षा गायकवाड यांनी येत्या सोमवारी पालिका आयुक्तांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर धोरण रद्द नाही केले तर न्यायालयात जाण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी माजी आमदार अशोक जाधव, माजी नगरसेवक अशरफ आजमी, जगदीश अण्णा अमीन, शीतल म्हात्रे, गणेश यादव, झिया उररहमान वाहिदी, प्रणिल नायर, प्रमोद मांद्रेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad