बिहारनंतर राजस्थानमध्येही जातनिहाय जनगणना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बिहारनंतर राजस्थानमध्येही जातनिहाय जनगणना

Share This

राजस्थान / मुंबई - मराठा नंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात आहे. बिहारने याची सुरुवात केली असून आता राजस्थानमध्येही जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याबाबत घोषणा केली. बिहारच्या जातनिहाय जनगणनेने राजकारणही तापले आहे. भाजपने याला विरोध केला, तर इंडिया आघाडीने याला पाठिंबा दिला आहे.

बिहार सरकारने नुकतीच जातनिहाय जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानंतर आता संपूर्ण देशात जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागली आहे. देशात सत्ता आल्यास जातनिहाय जननगणना करण्यात येईल असे काँग्रेसने घोषणा केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्येही याबाबत ठराव पास करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात बिहार प्रमाणे राजस्थानमध्येही जातनिहाय जनगणना करण्यात येईल, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. राज्यांमध्ये जातींचे प्रतिनिधित्व किती आहे, हे कळण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी होत आहे. नितीश कुमार यांनी जातनिहाय जनगणना केल्यानंतर आता इतर राज्यही याच प्रयत्नात असल्याचे दिसत आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणना केली आहे. त्यामुळे इतर राज्यांकडूनही अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages