बोरीवलीत आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2023

बोरीवलीत आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू


मुंबई - बोरीवलीत महावीरनगर येथील वीणा संतूर बिल्डिंगला आज दुपारी भीषण आग (fire in mumbai) लागली. या भीषण आगीत एका लहान बालकासह दोन जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे. तर तीन जण जखमी झालेत. जखमींवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Mumbai Fire News)  

बोरीवलीत मंथन पाडा येथील वीणा संतूर इमारतीला आज (२३ ऑक्टोबर) दुपारी पावणे दोनच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीत अडकलेल्या ५ रहिवाशांना बाहेर काढून जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी  ग्लोरी (43 वर्षे), जोसू रॉबर्ट (8 वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर लक्ष्मी बुरा (वय 40 वर्षे), राजेश्वरी भरतारे (24 वर्षे), रंजन शाह (76 वर्षे) हे तिघे जखमी आहेत. जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून केला जात आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad