मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – वाडी बंदर या सेक्शनवर मध्य रेल्वेकडून ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे २२ रेल्वे गाड्या प्रभावित होणार आहेत. पुणे-मुंबई दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस देखील ७ (शनिवार) आणि ८ (रविवार) ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
सीएसएमटी येथे सध्या १८ प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील ८ ते १८ प्लॅटफॉर्मवर मेल/एक्सप्रेस आणि प्रवासी रेल्वे थांबवल्या जातात. प्रवासी उतरल्यानंतर या रिकाम्या रेल्वे गाड्या मालाची चढ उतार, साफसफाई आणि देखभाल दुरुस्तीसाठी वाडीबंदर/माझगाव यार्डमध्ये नेल्या जातात.
वाडी बंदर येथून रेल्वे गाडी गरजेनुसार सिक लाईन, पिट लाईन, एक्झामिनेशन लाईन आणि स्टॅबलिंग लाईन अशा वेगवेगळ्या मार्गावर पाठवली जाते. सीएसएमटी ते वाडी बंदर दरम्यान रिकाम्या रेल्वेची ने-आण करण्यासाठी तीन लाईन आहेत. चौथ्या लाईनचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे.
या ब्लॉक मुळे २२ रेल्वे गाड्यांवर प्रभाव पडणार आहे. तर पुणे-मुंबई दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस (२२१०६, २२१०५) शनिवारी आणि रविवारी रद्द करण्यात आली आहे तर अन्य रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत
No comments:
Post a Comment