शिक्षकांच्या ३० हजार पदांसाठी १.६३ लाख अर्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2023

शिक्षकांच्या ३० हजार पदांसाठी १.६३ लाख अर्ज


मुंबई - राज्यात बारा वर्षांनी शिक्षक भरती (teacher's recruitment) होत असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारतर्फे (Maharashtra Government) शिक्षकांच्या ३० हजार रिक्त भरल्या जाणार आहेत. यासाठी राज्यभरातून १.६३ लाख अर्ज आले आहेत. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळा, खासगी अनुदानित व खासगी अर्थ अनुदानित शाळांमध्ये हे शिक्षक भरले जाणार आहेत.

राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी सांगितले की, शिक्षकांसाठी आवश्यक असलेली ‘टीएईटी’ परीक्षा २,१६,४४३ उमेदवारांनी दिली. त्यातून १,६२,५६२ उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यांची नावे पवित्र वेबसाइटवर टाकली आहेत.

आता या भरती प्रक्रियेत शिक्षण आयुक्तांनी खासगी अनुदानित शाळांना व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या शाळेतील रिक्त जागांची माहिती ‘पवित्र’ पोर्टलवर टाकायला सांगितली आहे. तथापि, शैक्षणिक संस्थांना त्यांचे रोस्टर अधिकाऱ्यांनी दुरुस्त करण्याचे निर्देशही दिले आहेत. आतापर्यंत, २३ जिल्ह्यांनी त्यांचे रोस्टर तयार केले आहेत, तर उर्वरित जिल्ह्यांनी तसे करणे बाकी आहे.

राज्य सरकारने २०१२ मध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये भरती प्रक्रिया बंद केली होती. कारण अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक अतिरिक्त होत असल्याचे आढळले होते, तर काही शाळांना गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक घेण्याची परवानगी दिली. परंतु २०१९ पर्यंत पूर्ण भरती पुन्हा सुरू झाली नाही, जेव्हा सरकारने ‘पवित्र’मार्फत १२ हजारांहून अधिक पदांसाठी केंद्रीकृत भरती प्रक्रिया सुरू केली.

२०२० मध्ये कोविड काळात राज्याची परिस्थिती बिकट बनल्याने सर्व भरती प्रक्रिया थांबवली. मात्र, त्यावेळी १९६ संस्थांमध्ये केवळ ६ हजार शिक्षकांची भरती केली. कारण सरकारला काही विशिष्ट श्रेणींसाठी, विशेषत: माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या १५ टक्के पदांसाठी पुरेसे पात्र आढळले नाही. राज्यात सध्या सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad