मुंबईत २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर १० टक्के पाणीकपात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर १० टक्के पाणीकपात

Share This

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. हे काम २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत केले जाणार आहे. या कामादरम्यान मुंबईमध्ये १० टक्के पाणी कपात केली जाईल अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम सोमवार २० नोव्हेंबर २०२३ ते शनिवार २ डिसेंबर २०२३ पर्यंत हाती घेण्याचे ठरविले आहे. सदर तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सबब, सोमवार २० नोव्हेंबर २०२३ ते शनिवार २ डिसेंबर २०२३ या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. 
     
मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages