Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Mahaparinirvan Din - मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनासाठी १४ विशेष गाड्या चालवणार


मुंबई - प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस ६ डिसेंबर २०२३ रोजी आहे. ३ विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, २ विशेष कलबुरगि आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई दरम्यान, २ विशेष सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान आणि १ विशेष अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई  चालविण्यात येईल. (14 special trains for Mahaparinirvana Day)

विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे -
नागपूर- मुंबई अनारक्षित विशेष (३)
१. विशेष ट्रेन क्र. ०१२६२ नागपूर येथून दि. ४.१२.२०२३ रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. 

२. विशेष ट्रेन क्र. ०१२६४ दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता  पोहोचेल. 

३. विशेष गाडी क्रमांक ०१२६६ दि. ५.१२.२०२३ रोजी नागपूर येथून १५.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.

ही गाडी नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या स्टेशनवर थांबेल. 

ट्रेनमधील कोचची संरचना -
विशेष ट्रेन क्रमांक ०१२६२ - १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. तर विशेष ट्रेन क्रमांक ०१२६४ आणि ०१२६६ - १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. 

मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष (६)
१. विशेष ट्रेन क्र. ०१२४९ दि. ६.१२.२०२३ रोजी १६.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० पोहोचेल. 

२. विशेष ट्रेन क्र. ०१२५१ दि. ६.१२.२०२३ रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता  पोहोचेल. 

३. विशेष ट्रेन क्र.  ०१२५३ दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.१२.२०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता  पोहोचेल. 

४. विशेष ट्रेन क्र.  ०१२५५  ७.१२ .२०२३ रोजी १२.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता  पोहोचेल. 

५. विशेष गाडी क्र.  ०१२५७ दि. ८.१२.२०२३ रोजी १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता  पोहोचेल. 

६. विशेष ट्रेन क्र.  ०१२५९ दि. ८.१२.२०२३ रोजी (७/८१२.२०२३ च्या मध्यरात्री) दादर येथून ००.४० सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.

ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर या स्टेशनवर थांबेल. 

संरचना:
विशेष ट्रेन क्रमांक ०१२४९, ०१२५५, ०१२५७ आणि ०१२५९ या विशेष ट्रेनला १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. 
विशेष ट्रेन क्रमांक ०१२५१ आणि ०१२५३ - १२ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

कलबुरगि - मुंबई अनारक्षित विशेष (२)
१. विशेष ट्रेन क्र.  ०१२४५ कलबुरगि येथून दि. ५.१२.२०२३ रोजी १८.३० वाजता सुटेल  आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल. 

 २. विशेष ट्रेन क्र.  ०१२४६ दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.१२.२०२३ च्या मध्यरात्री) ००.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी ११.३० वाजता  पोहोचेल.

थांबे: कलबुरगि, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

संरचना: ८ सामान्य द्वितीय श्रेणी 

सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष (२)
१. विशेष ट्रेन क्र.  ०१२४७ 
दि. ५.१२.२०२३ रोजी २२.२० वाजता सोलापूर येथून सपटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल. 

२. विशेष ट्रेन क्र.  ०१२४८ दि. ७.१२.२०२३ रोजी (६/७.२०२३ च्या मध्यरात्री) ००.२५ वाजता  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी ०९.०० वाजता  पोहोचेल.

थांबे: सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

संरचना: ९ सामान्य द्वितीय श्रेणी. 

अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष (१)
१. सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्र.  ०२०४० अजनी येथून दि. ७.१२.२०२३ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.

संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी. 

मध्य रेल्वेने दि. ६.१२.२०२३ रोजी सुरू होणार्‍या ट्रेन क्रमांक ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -आदिलाबाद एक्स्प्रेसचा प्रवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या फायद्यासाठी १ सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह वाढवण्याचा निर्णय देखील घेतला आहे. या विशेष गाड्यांची नोंद घ्यावी आणि आपला प्रवास सुखकर करावा. प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom