चेंबूर येथे सिलेंडरचा स्फोट, ६ जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2023

चेंबूर येथे सिलेंडरचा स्फोट, ६ जण जखमी


मुंबई - मुंबईत आगी लागणे, घर कोसळणे, गटारात नाल्यात पडून वाहून जाणे अशा घटना कालांतराने घडत असतात. आज सकाळी चेंबूर कॅम्प येथे सिलेंडरचा स्फोट होऊन ४ ते ५ घरे कोसळली. या घरामधून मुंबई अग्निशमन दलाने ११ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. या घटनेत ६ जण जखमी झाले असून त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  (Fire in Mumbai) (Cylinder blast in Mumbai)

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (२९ नोव्हेंबर) सकाळी ७.५२ वाजता चेंबूर कॅम्प, गोल्फ क्लब जवळ ओल्ड बॅरेक येथील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे तळ अधिक एक मजली असलेली ४ ते ५ घरे कोसळली. या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने वरच्या मजल्यावर अडकलेल्या ११ जणांची सुटका केली. या घटनेत ६ जण जखमी झाले असून त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर ओपीडीमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

जखमींची नावे - 
1) विकास अंभोरे 50 वर्षे 
2) अशोक अंभोरे 27 वर्षे
3) सविता अंभोरे 47 वर्षे 
4) रोहित अंभोरे 29 वर्षे 
5)    राहुल कांबळे 35 वर्षे
6)    पार्थ सिंग 21 वर्षे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad