Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शिवाजी पार्कवरील डेकोरेटर्सवर कारवाई करणार, पालिकेची भीम आर्मीला ग्वाही


मुंबई - महापरिनिर्वाण दिनी जनतेला सोयीसुविधा पुरविण्याची आमची जबाबदारी असली तरी महानगरलीकेने शिवाजी पार्कवर कोणताही मंडप डेकोरेटर नेमलेला नाही. पालिकेच्या नावावर कोणी गरसमज पसरवत असेल तर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही जी उत्तर विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत  सपकाळे यांनी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाला दिली. (Action will be taken against decorators at Shivaji Park)

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचेमार्फत आंबेडकरी जनतेसाठी विनामूल्य सेवा देण्यात येतात. यासाठी मंडप उभारण्यासाठी खाजगी डेकोरेटर अव्वाच्या  सव्वा पैसे घेवून पिळवणूक करतात. यासंदर्भात भीम आर्मीच्या शिष्ठमंडळाने जी उत्तर विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त  सपकाळे यांची भेट घेतली. विनामूल्य सेवा देणाऱ्या संस्था संघटनांच्या मंडपाची व्यवस्था महानगरपालिकेच्या बजेट मधून करण्यात यावी. लोकांची लुटमार करणाऱ्या डेकोरेटरवर आळा घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

यावर मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही मंडप डेकोरेटरला टेंडर दिलेले नाही. पालिकेचे नाव सांगणाऱ्या डेकोरेटरची पोलिसात तक्रार करण्यात येईल अशी ग्वाही सपकाळे यांनी यावेळी दिली. यासंदर्भातील  पालिका कार्यालय आणि शिवाजी पार्क येथे फलक लावण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. या शिष्टमंडळात भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड, जिल्हाध्यक्ष जाहीद शेख, एक वही एक पेन अभियानचे राजू झनके यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom