महापरिनिर्वाण दिनी चोख सुरक्षाव्यवस्था - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2023

महापरिनिर्वाण दिनी चोख सुरक्षाव्यवस्था


मुंबई - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा भाग म्हणून खासगी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर सुरक्षायंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर, एक्सरे बॅगेज स्कॅनर मशीन, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, डिस्प्ले स्क्रिनिंग आदींचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो नागरिकांची, व्हीआयपी, लोकप्रतिनिधी यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी पालिकेने विविध सुविधा पुरवण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. या काळात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. सुविधा, सुरक्षायंत्रणा पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडून पालिकेने टेंडर मागविले आहे. यामध्ये दादर, शिवाजी पार्क, चैत्यभूमी या परिसरात ठिकठिकाणी रेकॉर्डिंग सिस्टिमसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रवेशद्वारात डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर, हॅन्डहेल्ड मेटल डिटेक्टर, एक्सरे बॅगेज स्कॅनर मशीन, व्हिडिओ शूटिंग करणे यासाठी आवश्यक यंत्रणा भाडेतत्त्वावर पुरवली जाणार आहे. शिवाजी पार्क परिसरात लाईव्ह टेलिकास्टही करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी डिस्प्ले स्क्रिन लावण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सुरक्षेसाठी अशी असणार यंत्रणा -
सीसीटीव्ही कॅमेरे, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, एक्सरे बॅगेज स्कॅनर मशीन, व्हिडिओ शूटिंग कॅमेरे, एलईडी स्क्रिन्स डिस्प्ले, रेकॉर्डिंग यंत्रणा, ऑनसाईट स्ट्रिमिंग आदी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad