Mahaparinirvan Din - मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mahaparinirvan Din - मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन

Share This

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांकरिता केलेल्या सोयी-सुविधांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. 

दादर येथील चैत्यभूमीला मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या तयारीची पाहणी करुन शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांना भेट दिली, तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांची विचारपूस करुन सुविधांची माहिती घेतली. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सदासरवणकर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, सुधाकर शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages