मुंबई - नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये दारूचा महापूर येतो. दारूच्या पार्ट्या करून नव वर्षाचे स्वागत करणाऱ्यांसाठी राज्याच्या गृह विभागाने नाताळ सणासाठी 24, 25 आणि नववर्ष स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत बार आणि दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तळीरामांना सरकारने दिलासा दिला आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी मद्य विक्रीची दुकाने, परमिट रुम पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याशिवाय, काही ठिकाणी वाईन शॉप, परदेशी आणि उंची मद्य विक्री करणारी दुकाने ही रात्री 1 वाजेपर्यंत खुली असणार आहेत. त्याशिवाय, पब, बार अॅण्ड रेस्टोरंट्स, बीअर बारदेखील पहाटे पाच वाजेपर्यंत खुली असणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या या परवानगीमुळे मद्य प्रेमींची / तळीरामांची थर्टीफस्ट पार्टी दणक्यात साजरी होणार आहे. मद्यप्रेमींना आता 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विकत घेता येऊ शकणार आहेत.
सरकारला आर्थिक फायदा -
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण 31 डिसेंबर रोजी मद्यपान करतात आणि नववर्षाचे स्वागत दणक्यात करण्यासाठी पार्टी करतात. या काळात मद्याची मागणी असते. मद्याच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होतो. मद्य विक्रीमुळे राज्याला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळे या वेळ वाढवून देण्याच्या निर्णयामुळे सरकारला आर्थिक फायदा होणार आहे.
तळीरामांना दिलासा -
कोरोना व्हायरसचा प्रसार कमी झाल्यानंतर
राज्यात सत्ता परिवर्तन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार सत्तेत आले. कोरोना दरम्यान असलेले सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आदी सर्व सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्यात आले. त्यानंतर आता नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सरकारने बार आणि दारूची दुकाने पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवून तळीरामांना दिलासा दिला आहे.
No comments:
Post a Comment