ईव्हीएम हटाव, गणतंत्र बचाव, भीम आर्मीचा आझाद मैदानावर एल्गार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 February 2024

ईव्हीएम हटाव, गणतंत्र बचाव, भीम आर्मीचा आझाद मैदानावर एल्गार


मुंबई - ईव्हीएम हटाव, गणतंत्र बचाव असा नारा देत भीम आर्मीने आज मुंबईच्या आजाद मैदानावर धडक मोर्चा काढत निदर्शने केली. देशातील ९० टक्के लोकांची मागणी असली तरी केंद्रीय निवडणूक आयोग याची दाखल का घेत नाही असा सवाल करतानाच ईव्हीएम हटाव, गणतंत्र बचावचे आंदोलन महाराष्ट्र आणि देशपातळीवर करण्यात येईल अशी घोषणा यावेळी या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी यावेळी बोलताना केली. दरम्यान यावेळी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्रालयातील महाराष्ट्र निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना भेटून या  कार्यालयामार्फत  राष्ट्रपती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. 

भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या मुंबई प्रदेशच्या वतीने आज मुंबईच्या आझाद मैदानावर ईव्हीएम हटाव, गणतंत्र बचाव असा नारा देत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मूक भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या आंदोलनात सदर संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, महासचिव सुनील थोरात, रमेश बालेश, अविनाश गायकवाड, अविनाश समिंदर, राजकुमार साळे, राहुल वाघ, कृष्णा दांडगे, संतोष वाकळे, जाहिद अली शेख, किसन गायकवाड, पी एस पाईकराव, अनिल  चव्हाण, रवी बागुल, शब्बीर शिकलगार, सुरेश धाडी, भास्कर गायकवाड, रमेश दांडगे, शिवकुमार वर्मा, तुषार कदम सुनील वाकोडे, अतिक रहमान सिद्दीकी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कमला नेहरू पार्क येथील बस डेपोमधून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला मात्र हा मोर्चा मंत्रालयाकडे जात असतानाच आझाद मैदान पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना आझाद मैदानावर आणून सोडले. आझाद मैदानावर यावेळी  कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव, संदर्भातील जोरदार घोषणाबाजी करीत आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. जगातील ८० टक्के देशांनी ईव्हीएमला नकार देत मतपत्रिकेचा पर्याय स्वीकारला आहे तसेच भारतात देखील ९० टक्के जनतेने ईव्हीएमवर तीव्र हरकती घेत मतपत्रिकेला पसंती देत देशभर आंदोलने सुरु केली आहे. राष्ट्रपती, केंद्रीय ननिवडणूक  आयोग आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी यावेळी अशोक कांबळे यांनी केली. यासंदर्भातील निवेदन भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad