सोमवारी, ५ फेब्रुवारीपासून ज्योती गायकवाड या शहापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठी गेले ३० वर्षांपासूनच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी घर छोडो आंदोलन करीत आपला संसार तहसील कार्यालय शहापूर येथील मैदानात करीत आहे. त्यांनी स्मारकासाठी मागितलेल्या जागांपैकी काही जागा या नगरपंचायत हद्दीतील असून, त्या खाजगी मालकांच्या असल्याने त्या देण्यास नगरपंचायत प्रशासनाने नकार दिला. तर काही जागा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असून त्यांच्या अधिकाऱ्यांनी शासकीय परिपत्रकाचा दाखला देत सा. बा. विभागाच्या जागेत स्मारकासाठी जागा देण्यास नकार दिल्याने स्मारकाचा प्रश्न अनुत्तरित राहिला. तर पंचायत समिती शहापूर च्या मोकळ्या जागेचा वाद हा न्यायालयात सुरू असल्याने त्यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकासाठी जागा देण्यास नकार घंटा दाखवल .
शहापूर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगरसेविका कामिनी आकाश सावंत यांनी पुढाकार घेऊन हे घर छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकूर, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ज्योती गायकवाड यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. तहसीलदार व पोलीस प्रशासन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इतर जागा सुचवण्याचे आवाहन बैठकीसाठी आलेल्या आंबेडकर समूहाच्या जनतेला केले मात्र त्यात देखील एकमत न झाल्याने ही बैठक देखील निष्फळ ठरली.
तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत इतर जमिनीची मागणी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी करण्यात येणार असून, त्या मागणीला तरी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे असून, तेथे देखील असहकार्य झाल्यास घर छोडो आंदोलनाबरोबरच आमरण उपोषण सुरू करणार.
- ज्योती गायकवाड, आंदोलनकर्ते
ज्या जागांची मागणी आंदोलनकर्ते करीत आहेत, त्याला संबंधित विभागांनी नकार दिलेला असून, त्याबाबत त्यांनी लेखी पत्र आमच्या कार्यालयात दिलेले आहेत. स्मारकासाठी नवीन जागेचा प्रस्ताव जर का आला तर निश्चितच त्याचा पाठपुरावा संबंधित विभागाकडे आम्हाला करता येईल.
-कोमल ठाकूर, तहसीलदार, शहापूर
No comments:
Post a Comment