Lok Sabha Election - घाटकोपरमध्ये ७० लाखांची रोकड जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2024

Lok Sabha Election - घाटकोपरमध्ये ७० लाखांची रोकड जप्त


मुंबई - लोकसभा निवडणूकीचे (lok sabha 2024) बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या पंतनगरमध्ये निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ७० लाखांची रोकड जप्त केली आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेंस स्कॉडने (Election Commission Seized Cash) ही कारवाई केली आहे. (Mumbai News )

१६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण केली जाते. अशीच पैशांची देवाण घेवाण होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेंस स्कॉडला मिळाली होती. या माहितीनंतर या स्कॉडने एका गाडीतून ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एक व्यक्ती सीए आहे तर दुसरा व्यक्ती इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर असल्याचं समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंत नगर पोईस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची चौकशी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS