Mumbai News - मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2024

Mumbai News - मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती

 

मुंबई - लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर राज्यात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल केले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई, ठाणे तसेच विविध पालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज (२० मार्च) मुंबई महापालिकेच्या (BMC Mumbai) आयुक्तपदी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे महापिलेकचे आयुक्तपद सौरभ राव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

राज्यातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ज्या अधिका-यांनी एखाद्या नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम केलं असेल, त्यांची बदली करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश असूनही महाराष्ट्र सरकारने अशा अधिका-यांच्या बदल्या केल्या नव्हत्या. अखेर निवडणूक आयोगाने बदल्यांच्या मुद्यावर विविध राज्य सरकारांना दणका दिला होता. निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, आश्विनी भिडे आणि पी. वेलारुसू यांची बदली करण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती. अखेर आयोगाने बदल्या केल्या होत्या. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नवी मुंबईचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी भूषण गगराणी , अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी या तीन आयएएस अधिका-यांची नावे सुचवली होती. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे महापिलेकचे आयुक्तपद सौरभ राव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad