दादर ऐवजी परेल स्थानकाला बाबासाहेबांचे नाव द्यायला आंबेडकरी समाजाचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 March 2024

दादर ऐवजी परेल स्थानकाला बाबासाहेबांचे नाव द्यायला आंबेडकरी समाजाचा विरोध


मुंबई (जेपीएन न्यूज) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्थानकाला (Dadar Railway station) द्यावे अशी मागणी आंबेडकरी जनतेकडून केली जात आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून परेल रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी राज्य सरकारला दिला आहे. शेवाळे यांच्या मागणीला भीम आर्मी (Bheem Army) या संघटनेने विरोध केला असून दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचे नाव द्यावे अन्यथा येत्या निवडणुकीत आंबेडकरी जनता धडा शिकवेल असा इशारा देण्यात आला आहे. (Babasaheb's name to Parel station instead of Dadar)

दादर स्थानकाला नाव देण्याची मागणी - 
मुंबईत दादर पश्चिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी आहे. दादर पूर्वेला बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले राजगृह आहे. १४ एप्रिल, ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर येथे येत असतात. महापरिनिर्वाण दिनी दादर, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात आंबेडकरी जनतेचा अथांग सागर लोटला असतो. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्थानकाला द्यावे अशी मागणी गेले कित्येक वर्षे केली जात आहे. या मागणीसाठी भीम आर्मीसह आंबेडकर समाजातील अनेक संघटनांनी राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच रेल्वे प्रशासनाकडे तशी लेखी मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलनही करण्यात आली आहेत.

परेल स्थानकाला नाव देण्याला विरोध - 
दादर रेल्वे स्थानकाला नाव देण्याची मागणी असताना शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी परेल रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. परेल रेल्वे स्थानक टर्मिनस झाले आहे. आता दादर ऐवजी परेल रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटतात. त्यामुळे परेल रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचे नाव देणे योग्य ठरेल असे खासदार शेवाळे यांनी फोन करून सांगितल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली. दादर रेल्वे स्थानकाला नाव देण्याची मागणी असताना परेल स्थानकाला नाव का दिले जात आहे? असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला आहे. खासदार शेवाळे यांनी आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर राखून परेल स्थानकाला नाव देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा व दादर रेल्वे स्थानकाला नाव देण्याचा प्रस्ताव सरकारला द्यावा. अन्यथा आंबेडकरी जनता येत्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा कांबळे यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad