बार्टीच्या संशोधकांची शनिवारी विचारवंतांसोबत बैठक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बार्टीच्या संशोधकांची शनिवारी विचारवंतांसोबत बैठक

Share This

मुंबई - फेलोशिपसाठी लढत असलेल्या बार्टीच्या संशोधकांची दलित चळवळीतील विचारवंतांसोबत एक महत्वपूर्ण बैठक उद्या शनिवारी २ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आझाद मैदाननजीकच्या माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या खोरीपच्या कार्यालयात होणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे सरचिटणीस, संशोधक प्रकाश तारु यांनी आज दिली. (Barti's researchers meet with intellectuals on Saturday)

उद्याच्या बैठकीसाठी प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे, राजकीय विश्लेषक सुनील कदम, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगांवकर, प्राचार्य रमेश जाधव, पँथर नेते सुरेश केदारे, प्रा. एकनाथ जाधव, सतीश डोंगरे ,ऍड. जयमंगल धनराज आदी विचारवंत उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने फेलोशीपबाबत आडमुठी भूमिका घेवून फक्त आणि फक्त अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचीच अडवणूक चालवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक - अध्यक्ष शरद पवार यांनी विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यावर या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर, उद्या होणाऱ्या संशोधकांच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages