मुंबई (जेपीएन न्यूज) - मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२४ रोजी केवळ महिलांसाठी विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असताना रक्तदानासाठी त्यांनी पुढे यावे यासाठी महिलांनीच हे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब शिक्षित होतं तसेच एका महिलेने रक्तदान केले तर सर्व कुटुंब रक्तदानासाठी प्रेरित होतील असा विश्वास या शिबिराच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. उन्हाळ्यात येऊ घातलेल्या रक्त टंचाईच्या पार्श्वभूमीवर हे महिलांसाठी असलेले विशेष रक्तदान शिबीर रक्तदानाचं महत्व अधोरेखित करते. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. मोहन जोशी यांच्या प्रोत्साहनाने तसेच विक्रृती शास्त्र विभागाच्या प्रमुख डाॅ.अंजली अमरापूरकर तसेच रक्त केंद्राच्या प्रमुख डाॅ. कविता सावंत यांनी रक्तदानासाठी जास्तीत जास्त महिलांनी या जागतिक महिला दिनी रक्त दानासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे. रक्त केंद्रातील समाज विकास अधिकारी, डाॅक्टर्स, कर्मचारी तसेच संडे फ्रेंड्स या सेवाभावी संस्थेने हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment