मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 March 2024

मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक


नवी दिल्ली - दिल्ली मद्यविक्री धोरण घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी म्हणून केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने अटकेपासून अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिल्यावर ईडीने त्यांना अटक केली आहे. (Chief Minister Kejriwal arrested by ED)

सक्तवसुली संचालनालय (ईडी) पथक त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी पोहोचले होते. दिल्लीचे मद्यविक्री धोरण लागू करताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने याआधी अनेकवेळा समन्स जारी केलेले आहे. मात्र यावेळी ईडीचे पथक थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले. त्यामुळे केजरीवाल यांना अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता असे असताना केजरीवाल यांना रात्री ९ वाजता अटक करण्यात आली आहे.

दिल्ली मद्यविक्री धोरण घोटाळा प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला. यासह न्यायालयाने ईडीला केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नव्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच या प्रकरणावर पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होईल असे सांगितले. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे केजरीवाल यांच्यासाठी चांगलाच धक्का असल्याचे मानले जात आहे. याच निकालानंतर आता ईडीचे पथक थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडकले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad