Lok Sabha Election - मोदींच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा


आंध्र प्रदेश / पलनाडू - अबकी बार 400 पार अशी घोषणा करत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पंतप्रधान बनवण्याच्या संकल्प भाजपाने केला आहे.आत्र निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आचारसंहिता भंग (violation-of-conduct-Code-of-Code-of-conduct-) केल्याची तक्रार दाखल झाली आहे. आंध्र प्रदेशातील पलनाडू येथील निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरले. याप्रकरणी मोदींच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी १७ मार्च रोजी पलनाडू जिल्ह्यातील बोप्पुडी गावात एनडीएच्या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले होते. रॅलीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत होते. टीएमसी खासदार साकेत यांनीही आंध्र प्रदेश निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना आचारसंहितेचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता, असेही ते म्हणाले.

निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. अशावेळी या आचारसंहितेचे पालन करणे सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांचे काम आहे. अशा परिस्थितीत स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याने निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करतो का ? याकडे आता सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments