Mumbai News - मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरीकांसाठी राखीव डबा ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

19 March 2024

Mumbai News - मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरीकांसाठी राखीव डबा !



मुंबई - मुंबई लोकलमधून (Mumbai Local Train) गर्दीच्या वेळेत प्रवास करणे खूप कठिण होऊन जाते. ऑफीसला जाणारे कर्मचारी आणि कॉलेजचे विद्यार्थी यामुळं सकाळच्या वेळेत लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा उरत नाही. अशावेळी कधी कधी दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्यात किंवा मालडब्ब्यातही प्रवासी चढतात. त्यामुळं गर्दीच्या वेळेत जेष्ठ नागरिकांना प्रवास करणे खूप कठिण होऊन जाते. मात्र, आता महामुंबईतील नागरिकांचा लोकल प्रवास सुखाचा होणार आहे. जेष्ठ नागरिकांसाठी (senior citizens) एक डबा राखीव (Reserved compartment) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Reserved compartment for senior citizens in local train)

जेष्ठ नागरिकांना रोजचा प्रवास करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं त्यांची ही अडचण लक्षात घेऊन लोकलमधील मर्यादित आसनांच्या मुद्द्यावरुन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यावर तोडगा काढण्याची सूचना केली होती. त्यावेळी रेल्वेने मालडब्याचे जेष्ठांसाठीच्या राखीव डब्यांत रुपांतर करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले होते. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. आता रेल्वेच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळं लवकरच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये जेष्ठांसाठी राखीव डब्बा असणार आहे. एका लोकलमध्ये चार मालडब्बे असतात. गाडीच्या मध्यभागी असलेल्या मालडब्यात बदल करण्यात येणार असून त्याचे रुपांतर करुन तो जेष्ठांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या डब्यात 104 प्रवाशांची क्षमता असून 13 आसने आणि 91 उभे प्रवासी असे आसनक्षमता आहे. लवकरच हे बदल करण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिकांसाठी घेतलेल्या या निर्णयानंतर हा बदल न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशा सूचना संबंधित विभागाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच, हे बदल लवकरच दिसून येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकलच्या पहिल्या आणि शेवटच्या सेंकड क्लास डब्यात प्रत्येकी सात आसने जेष्ठ नागरिकांसाठी राखीव असतात. तर, 12 डब्यांच्या लोकलमध्ये 4 फर्स्ट क्लासचे डबे असतात. तर, तीन महिला प्रवाशांसाठी राखीव व दिव्यांग प्रवाशांसाठी दोन डबे आणि उर्वरीत डबे सर्वसामान्यांसाठी राखीव असतात. मालडब्यातील मालवाहकांचे प्रवासी भारमान अत्यंत कमी असल्याने एक मालडबा जेष्ठांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मध्य व पश्चिम रेल्वेने सर्वेक्षण केले होते. त्यानंतर या बदलाला संबंधित विभागाने मंजुरी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS