Jobs - ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Jobs - ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी!

Share This

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयात (Enforcement Directorate) नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी ईडीने उपसंचालक ते ड्रायव्हर या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांकडे या पदांशी संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. ते ईडीच्या अधिकृत वेबसाइट, enforcementdirectorate.gov.in वर अर्ज करू शकतात. या ईडी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे विलंब न लावता त्वरित करा अर्ज.

ईडीच्या या भरतीप्रक्रियेंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्यास इच्छूक मेदवार १६ एप्रिल किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतो. जर तुम्हाला इडीमध्ये अधिकारी व्हायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकता.

इडीमध्ये या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील. याचबरोबर वयोमर्यादेशी संबंधित सर्व तपशील अधिसूचनेत पाहता येतील. या ईडी भरती अंतर्गत कोणते उमेदवार निवडले जातील, त्यांना वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन दिले जाईल. उमेदवारांना पदानुसार १,५१,००० रुपयांपर्यत पगार मिळू शकतो.

ED Recruitment 2024: 
येथे सूचना आणि अर्ज लिंक पहा
अधिसूचना – https://enforcementdirectorate.gov.in/vacancies

अर्ज करण्यासाठी लिंक - https://enforcementdirectorate.gov.in/

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages