मुंबई - मेट्रोत नोकरीची मोठी संधी असून रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त एकूण रिक्त ९ जागांसाठी अर्ज करू शकता. या नऊ जागा कोणत्या पदांसाठी आहेत? अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. (MMRCL Metro Job Requirements)
सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा), सहायक महाव्यवस्थापक (आरएस), सहायक व्यवस्थापक (पीआर), सहायक व्यवस्थापक (अग्निशामक), उपअभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता -II (E&M), अग्निशमन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल), सीनियर असिस्टंट (एचआर) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवाराची वयोमर्यादा ४० वर्षे आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे. http://www.mmrcl.com या अधिकृत साइटवर सविस्तर माहिती मिळवू शकता. पात्र उमेदवारांना दोन लाखांपर्यंत वेतन मिळणार आहे.
Jobs - मेट्रोत वरिष्ठ अधिकारी बनण्याची संधी
Share This
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment